Share

उत्तर प्रदेशमध्ये सपाची जोरदार मुसंडी; सुरवातीच्या आघाडीनंतर भाजपच्या जागा कमी व्हायला सुरवात

yogi

आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १५१ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप ८४ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६३ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही.

सध्या उत्तर प्रदेशात भाजप – सपा मध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे. सपा देखील भाजपाला चांगलीच टक्कर देत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीत भाजपला मोठे यश मिळत असल्याच्या अंदाज व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी भाजप आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

राज्य सरकार हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे चोरत असून वाराणसीमध्ये अशा यंत्रांचा एक ट्रक पकडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मतदानोत्तर चाचण्या म्हणजे भाजपच विजयी होणार असल्याचा समज पसरविण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांची भाजपशी हातमिळवणी असल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
पंजाबमध्ये आपची जोरदार घोडदौड; कॉंग्रेसची मात्र पिछेहाट
मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंग्रजी बोलताना अडखळली होती सुष्मिता सेन, पण ‘या’ उत्तराने जिंकले विजेतेपद
शेतकऱ्याचा नाद खुळा! एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा आज करोडपती झाला; शेतीत केला ‘हा’ भन्नाट प्रयोग
शेतकऱ्याचा नाद खुळा! एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा आज करोडपती झाला; शेतीत केला ‘हा’ भन्नाट प्रयोग

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now