Share

उत्तर प्रदेशमध्ये योगी सुसाट; सपाची सायकल पंक्चर; काॅंग्रेसचा भोपळा

yogi

पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार होतं आहेत. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. तसेच राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. पैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे.

तसेच बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता असणाऱ्या भाजपाने सुरुवातीच्या कलांमध्ये जबरदस्त आघाडी घेतली आहे. भाजपा १०० हून अधिक जागांवर पुढे असून सपादेखील ५० च्या पुढे आहे.

दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे गोव्याची सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. निवडणुकीच्या आधीच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड केलं. त्यामुळे भाजप गोव्याची सत्ता शाबूत ठेवणार का, याकडे आता देशाच लक्ष लागलं आहे.

याचबरोबर यंदा गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवारांनी भवितव्य आजमावलं आहे. एकूण 17 राजकीय पक्ष या निवडणुकीत भवितव्य आजमावत असून यात प्रामुख्याने भाजप आणि आपने सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे गोव्यात काँटे की टक्कर असणार आहे.

तसेच एक्झिट पोलनुसार, गोव्यात कोणत्याही एक पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. तसेच इतर पक्षांमध्ये काँग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा अंदाज आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या
मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंग्रजी बोलताना अडखळली होती सुष्मिता सेन, पण ‘या’ उत्तराने जिंकले विजेतेपद
‘हा’ ५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची चढाओढ, १ लाखांचे केले तब्बल २७ कोटी
ट्रान्सपरंट गाऊन घालून समोर आली ‘मलायका अरोरा’, फोटो पाहून चाहते झाले थक्क
शेतकऱ्याचा नाद खुळा! एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा आज करोडपती झाला; शेतीत केला ‘हा’ भन्नाट प्रयोग

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now