सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जोमाने पक्षबांधणीसाठी कामाला लागले आहेत. सध्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. या कठीण काळात अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. मात्र काही निष्ठावान नेते सत्ता नसतानाही उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
आज उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली. भगव्याचे निष्ठावंत शिलेदार एक एक करुन तुमची साथ सोडत आहेत.
मात्र या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे आम्ही पदाधिकारी तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी बोलताना दिली. याचबरोबर उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात बैठक देखील पार पडली.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून, सतर्क राहा अशी सूचना कार्यकर्त्यांना दिली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या, पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे आहे, हे लक्षात ठेवा.’
दरम्यान, सध्या दौरे, बैठकांचे सत्र जोरदार सुरू आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. बंडखोर आमदारांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात येत आहे. सध्या राज्याच्या राजकारण चांगलच तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता