गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहे.
अशातच उत्पल पर्रीकरांविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे. उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिल्याचा खुलासा सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या या विधानाने सध्या गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पर्रीकर यांना ३-४ जागांची ऑफर देण्यात आली होती, त्यांनी एक जागा निवडायला हवी होती. आमच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना ज्या ३-४ जागांची ऑफर दिली होती, त्यांनी त्या जागेवर निवडणूक लढवायला हवी होती.’
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जर पर्रीकर यांनी निवडणूक लढवली असती तर ते मोठे नेते बनू शकले असते. ते पणजीच्या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी का आग्रही होते, यात त्यांचे काय वैयक्तिक विचार होते याची मला कल्पना नसल्याचे सावंत यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे.
दरम्यान, “लोक आमच्या बरोबर आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी मला विश्वास आहे. परत एकदा भाजपाचं सरकार गोव्यामध्ये स्थापन होईल. गोव्या मुख्यत: विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक मानसाला मी घरी पाठवले आहे.’ असेही सावंत म्हणाले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली.
तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी खूप मोठी रिस्क घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
झोपडपट्टी धारकांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, फक्त अडीच लाखात मिळणार घर
‘मी माफी मागायला तयार, हा विषय आता संपवा’; सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर बंडातात्या अखेर नरमले
आमिर खान किरण राव पुन्हा येणार एकत्र? दोघांचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल
VIDEO: खुपच आलिशान आहे सुनिल शेट्टीचा खंडाळ्यातील बंगला, कारच्या सनरूफसारखे उघडते घराचे छत