गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून कॉंग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष पणजी मतदार संघाकडे लागले होते. कारण, भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकरांना पक्षाला राम राम ठोकला.
पक्षाला राम राम ठोकल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा मोठा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष पणजी मतदार संघाकडे लागले होते. मात्र भाजपानं तिकीट न दिल्यानं अपक्ष उमेदवार राहिलेल्या उत्पल पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं.
पणजी मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले. “अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया उत्पल पर्रिकरांनी माध्यमांना दिली होती.
आज पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांशी बोलताना निकालाबाबत भाष्य केले आहे. भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर पुन्हा भाजपासाठी काम करणार का?, भाजपात जाणार का?, यावरही त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ‘ ह्या तांत्रिक गोष्टी आहेत, त्या हळूहळू सॉर्टआऊट होतील’, असं उत्पल यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भाजपचा सिम्बॉल माझ्याकडे असता तर मी कुठच्या कुठे गेलो असतो’, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय. ‘भाजपमध्ये नसलेल्या माणसाला तिकीट दिलं. माझी क्षमता जास्त आहे. मला गोव्यानं चांगला पाठिंबा दिला. त्याबाबत लोकांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे’ असं उत्पल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, २१ जानेवारी रोजी भाजपाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
फक्त १४०० रुपये खर्च करा आणि घरी आणा ५ स्टार Window AC; भेटत आहे बंपर डिस्काऊंट
VIDEO: रंग माझा वेगळा मालिकेला वेगळे वळण, होळीच्या दिवशी दीपा आणि कार्तिक भांगेच्या नशेत…
ठिपक्यांची रांगोळी: खडूस शशांकने मागितली अपुर्वाची माफी, हनिमूनला जाण्यासाठी.., पहा आज काय होणार
‘१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले’, काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले