Share

मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव होता; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट

utpal parrikar

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (manohar parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (utpal parrikar) यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal parrikar allegation on bjp)

पक्षाला घरचा आहेर दिल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक विधान केले आहे. ‘मला पक्षाने तिकीट दिली नाही ते १९९४ च्या स्थितीसारखं आहे. जेव्हा माझे वडील मनोहर पर्रिकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना लोकांचे मोठं समर्थन होते त्यामुळे त्यांना बाहेर करता आलं नाही. आता ते विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत, असा खुलासा त्यांनी केला.

तसेच पुढे बोलताना उत्पल पर्रिकर यांनी २०१९ च्या पणजी पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकांचं समर्थन असतानाही मला तिकीट देण्यात आली नाही.

जेव्हा जे. पी नड्डा गोव्यात आले होते तेव्हा ५ दाम्पत्यांनी होणाऱ्या निवडणुकीत तिकीट मागितलं होतं. जर मनोहर पर्रिकर जिवंत असते तर एकाही पुरुष नेत्याने स्वत:च्या पत्नीला तिकीट मागण्याची हिंमत केली नसती असंही उत्पल पर्रिकर यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली.

तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी खूप मोठी रिस्क घेतली आहे.

मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूप जणांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले. गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारले आहे. इथल्या लोकांना माहिती आहे. हा मनोहर पर्रीकरांच्या पार्टीतला निर्णय वाटत नाही. माझं काम नव्हतं तर इतर मतदार संघाचे पर्याय कसे दिले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आहेत ४ लग्न, चौथी पत्नी तर होती २९ वर्षांनी लहान
‘या’ मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सने घातला होता धुमाकूळ, सीन्स पाहून सेन्सर बोर्डली हादरले होते
‘राजकीय भूमिका कशाला हवी?’, नाना पटेकरांनी किरण मानेंना फटकारले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now