शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यापासून राजकारणात खळबळ माजली होती. बरेच दिवस चाललेला हा खेळ बुधवारी संपला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्हवर राजीनामा देण्याची घोषणा केली.
यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि येतानाही अनपेक्षितपणे आलो होतो आणि जातानाही अनपेक्षितपणे जात आहे असं सांगत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, निलम गोऱ्हे इ. नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये काही कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही एक भावनिक ट्विट केले आहे.
दोन वर्षांपुर्वीच उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या शिवसेनेच्या प्रचारातही उपस्थित असतात. महाविकास आघाडीच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकरचेही नाव होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
त्यांनी हे दुख ट्विट करत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, धन्यवाद उद्धव ठाकरे जी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य जातीयवाद आणि द्वेषापासून लांब राहिले. तुमचे नेतृत्व हे अनुकरणीय, पुराग्रहरहित, धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी आणि संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र! त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, बुधवारी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला.
भाजप नेते एकमेकांना मिठाई भरवताना दिसले. बंडखोर आमदार आज मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते गोवा येथे थांबले होते. एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आल्यानंतर फडणवीसांसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा करतील. लवकरच भाजपचे सरकार येईल असं बोललं जात आहे. दीपक केसरकरांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, राज्यात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येईल. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यापासून अनेक स्तरांतून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1542211823147294720?s=20&t=Gtye9W0l08w9fQnzKlaqTQ
महत्वाच्या बातम्या
आता उतायचं नाही, मातायचं नाही, फक्त..; पुन्हा सत्ता मिळाल्यावर फडणवीसांची प्रतिक्रीया
तुम्ही प्रामाणिक, महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील..; राज यांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतूक
फडणवीस मंत्रीमंडळाची संभाव्य यादी आली समोर; पहा कुणाकुणाची लागणार मंत्रीपदी वर्णी
आज चाणक्य लाडू खात असले तरी…; साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने उद्धव ठाकरेंचे केले तोंडभरुन कौतूक