Share

urfi javed : …तर चित्रा वाघ यांची आणि माझी चांगली मैत्री होईल; उर्फीचा चित्रा वाघ यांना टोला 

urfi javed chitra wagh

urfi javed tweet on chitra wagh  | बिग बॉस फेम उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला लोकं ट्रोलही करतात. पण आता भाजप नेत्या चित्रा वाघ तिच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे. पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी तक्रारही केली असून त्या उर्फीविरोधात रस्त्यावरही उतरल्या होत्या. तसेच ती जिथं कुठे दिसेल तिथे तिच्या कानशिलात लगावणार, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. चित्रा वाघच्या या भूमिकेवर उर्फी जावेदही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

नववर्षाला सुद्धा उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा फक्त चित्रा वाघ यांना सोडून, असे ट्विट तिने केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. उर्फीने आता चित्रा वाघ यांना थेट आव्हान दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी जर त्यांची संपत्ती उघड केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असे उर्फीने म्हटले आहे. उर्फीने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत चित्रा वाघ यांना आव्हान दिले आहे. तसेच  उर्फीने शिवसेना नेते संजय राठोड यांचाही उल्लेख केला आहे.

जर भाजपमध्ये प्रवेश केला तर चित्रा वाघ यांच्याशी चांगली मैत्री होईल. चित्रा वाघजी तुम्हाला संजय राठोड आठवताय का? त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली. तुम्ही त्यांच्या सर्व चुका खुप लवकर विसरुन गेल्या, असे ट्विट उर्फीने केले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडांचे नाव समोर आले होते. चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांचा राजीनामा घेण्यासाठी चित्रा वाघ मैदानात उतरल्या होत्या. पण त्यानंतर संजय राठोडांना पुजा चव्हाण प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
chitra wagh : ‘आपल्या लेकीबाळींसमोर असे आदर्श..’; उर्फीचे समर्थन करणाऱ्या अधारेंना चित्रा वाघांनी झापले
Adani : मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरुन ठेवा…; वीज कर्मचाऱ्यांनी घेतला संपावर जाण्याचा निर्णय 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी फॅमिली! एका वेळेला लागतो १५०० चा भाजीपाला, २० लिटर दूध

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now