Share

उर्फीने घातला दोऱ्या दोऱ्यांचा ड्रेस; नेटकरी म्हणाले, या दोरीने आमच्याकडे गाय म्हशी बांधतात

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत येत असते. अनेकदा ती हटके लुक करताना दिसून येते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता उर्फी जावेद पुन्हा एकदा अतरंगी आउटफिटसह परतली आहे. ती आता एका वेगळ्याच स्टाईलच्या बिकीनीमध्ये दिसून आली आहे. (urfi javed troll because of net dress)

तिने स्वतःचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद तिचा लूक आणि फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने निळ्या रंगाची ब्रा आणि पँटी घातली आहे. याच्या वर तिने मल्टी कलर नेट लावले आहे. आता या आऊटफिटला नक्की काय म्हणतात ते माहित नाही, पण उर्फी त्यामुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फी लिहिते, ‘हिवाळा की उन्हाळा? पावसाळा. त्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनीही यावर कमेंट केल्या आहे. रिऍलिटी टीव्ही स्टार दिव्या अग्रवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणाली की, हे खुप आवडलंय. मला दे.

अशात उर्फीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले की, अरे हिने मासेमारीचे जाळे घातले असते तर बरे झाले असते…ते नेक्स्ट लेव्हल झालं असतं. तर एकाने लिहिले, उर्फी जावेद कपडे जरा व्यवस्थित वापरत जा. अशात एकाने या ड्रेसवरुन तिची खिल्ली उडवली आहे. या दोरीने आमच्याकडे घरच्या गायी-म्हशी बांधतात, असे म्हटले आहे.

तसेच अनेक चाहते आहेत, जे कमेंट सेक्शनमध्ये उर्फी जावेदचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की हॉलीवूडने उर्फीला फॅशन डिझायनर म्हणून ठेवावे. तिची फॅशन खूप चांगली आहे. आणखी एकाने लिहिले की, तिलाही उर्फीसारखा फॅशनसेन्स हवाय. तर एका चाहत्याने उर्फीच्या क्रिएटिव्ह माइंडचे कौतुक केले आहे.

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तर ६४ हजार लोकांनी तिचा हा व्हिडिओ लाईक केला आहे. उर्फी जावेदची इंस्टाग्रामवर चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. तिला ३० लाखांपेक्षा जास्त लोक इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

महत्वाच्या बातम्या-
माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी
काँग्रेसची तीन मतं होणार रद्द? एकमेव जागाही धोक्यात आल्याने काँग्रेसला फुटला घाम
“तर मग हा शो बंद करून…” , ‘तारक मेहता’ मालिकेच्या निर्मात्यांवर चाहते संतापले

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now