पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता चार राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले. या निवडणुकीचे निकाल कालच हाती आले. विशेषत: उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मिळालेले यश अभूतपूर्व असे आहे. ऐंशीच्या दशकानंतर या राज्यात कोणत्याच पक्षाला अशी संधी मिळालेली नाही.
योगी सरकार त्यास अपवाद ठरले. यूपीत काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. चार राज्यात भाजपाला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आपने बाजी मारली आहे. तसेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.
या निकालानंतर आता आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. या निकालावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान; त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल,’ असे राऊत म्हणाले.
भाजपच्या घवघवीत यशाबद्दल बोलताना पुढे संजय राऊत म्हणाले, “लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचं आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत.”
तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘पंजाबसारख्या सेंसेटीव्ह राज्यात भाजपला विजय मिळवता आला नाही. उत्तर प्रदेश मध्ये संपूर्ण भाजपने ताकद लावली परंतु पंजाबमध्ये भाजपने निवडून येणे गरजेचे होते. पंजाबमधील नागरिकांनी भाजपला नाकारले, असे म्हणत राऊत यांनी भाजपला लक्ष केले.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! तीन तलाकची बातमी लावल्याने पत्रकाराला केली मारहाण
निकालाआधी बोलला होता पक्ष सत्तेवर आला नाही तर विष घेऊन जीव देणार, कार्यकर्त्याने शब्द केले खरे
काश्मिर फाईल्स: ७०० पेक्षा जास्त पिडीत कुटुंबाची ‘ही’ कथा ऐकल्यावर पल्लवी जोशीच्याही डोळ्यातून आले पाणी
अखेर प्रतीक्षा संपली! मारूतीची स्विफ्ट डिझायर आली सिएनजी व्हेरीयंटमध्ये; किंमत आहे फक्त…