Share

मस्करी पडली महागात! मित्रांनी नको त्या ठिकाणी प्रेशरनं हवा भरली; धुळ्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Dhule: कोणाची चेष्टा करताना ती कशी आणि कधी करायची याचे भान ठेवावे. कारण आपण सहज चेष्टा करायला जातो. अशीच चेष्टा करणं अंगलोट आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे.

तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे. मात्र, या तरुणाचा मृत्यू केवळ विनोदामुळे झाला आहे. कंपनीत काम करत असताना तुषारसोबत त्याचे काही सहकारी काम करत होते. काम संपवून ते कंपनीत मस्ती करू लागले. गंमत करताना तुषारच्या मित्रांनी एअर कॉम्प्रेसर मशिनने त्याच्या गुदद्वार हवा भरली.

काही वेळानंतर तुषारची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तुषारची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तात्काळ सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुषारवर उपचार सुरू असतांनाच दुर्दैवाने तुषारचा मृत्यू झाला.

संबंधित प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनी खेळलेल्या खोड्यामुळे तुषारचा जीव गेला. मात्र, तुषारच्या अशा अचानक जाण्याने निकुंभ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, तुषारचे सहकारी मित्रही आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप करत आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हा अपघात होता की पूर्वनियोजित हल्ला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

 

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now