इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील मागील ३ सिजनमध्ये युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय टी २० संघात स्थान मिळवेल, असा विश्वास टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. (umran malik and arshdeep singh entry in indian team)
अर्शदीप सिंगने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. गेल्या ४ सिजनमध्ये तो पंजाब किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या ४ खेळाडूंमध्ये अर्शदीपचाही समावेश होता. २३ वर्षीय वेगवान गोलंदाजाने आपल्या खेळात सुधारणा केली आहे तर या सिजनमध्ये तो डेथ ओव्हर्समध्येही चमकदार गोलंदाजी करत आहे.
तो खूप तरुण आहे आणि दबावाच्या परिस्थितीत देखील चांगली कामगिरी करत आहे. त्याची ही कामगिरी अद्भूत आहे. दबावातही तो शांत राहतो आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करतो, असे रवी शास्त्रींनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
तसेच त्याची कामगिरी पाहता त्याच्यात वेगाने चांगले बदल होत आहे. त्यामुळे तो भारतीय संघात सामील होऊ शकतो, असेही रवी शास्त्रींनी म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सला त्यांनी मुलाखत दिली, त्यावेळी ते बोलत होते. तसेच या आयपीएलच्या सिजनमध्ये सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक हाही चर्चेत आला आहे. ब्रायन लाराने मलिकची तुलना वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सशी केली आहे.
ब्रायन लारा म्हणाला की, उमरान मलिक मला फिडेल एडवर्ड्सची आठवण करून देतो. तो खूप वेगवान गोलंदाजी करायचा. मला वाटते की मलिकला माहित आहे की याद्वारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवू शकतो. मला वाटते की तो नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळेल.
तसेच ब्रायन लारा पुढे म्हणाला की, आयपीएलमध्ये फलंदाजांना वेगवान गोलंदाजी खेळण्याची सवय लागते. त्यामुळे नंतर तो गोलंदाजीत सुधारणा करेल अशी मला आशा आहे. तो नेटमध्ये झपाट्याने आणखी गोष्टी शिकेल. त्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, जे चांगले आहे. उमरान मलिकने ताशी १५० किमी वेगाने चेंडू टाकून सर्व फलंदाजांना हैराण केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ढसाढसा रडत रतन टाटांनी सांगीतले, ‘यापुढचे आयुष्य आरोग्यसेवेसाठी देणार’
सेलिब्रिटींसोबत दिसणारी ‘ही’ चिमुकली आहे प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार; इन्स्टावर आहेत लाखो फॉलोअर्स, जाणून घ्या तिच्याबद्दल..
24 वर्षांच्या ‘या’ खेळाडूला बनवा टिम इंडियाचा कर्णधार, युवराज सिंगने बोलून दाखवली मनातली इच्छा