Share

उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य

भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे (Umran Malik) नाव सध्या क्रिकेट जगतातील प्रत्येक दिग्गजांच्या ओठावर आहे. १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने सर्वांनाच मोहिनी घातली आहे, ज्यामुळे त्याला आयपीएल २०२२ नंतर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आली आहे. १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव देखील उमरान मलिकच्या प्रतिभेने प्रभावित झाले आहे. मात्र यासोबतच त्यांनी उमरानला एक खास सल्लाही दिला आहे.(Umran Malik, Kapil Dev, International Series)

२२ वर्षीय उमरान मलिक सध्या भारतीय संघातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. IPL २०२२ मध्ये, उमरानच्या नावावर १५० च्या वेगाने सर्वाधिक ओवर टाकण्याचा विक्रम होता. त्याची अद्वितीय प्रतिभा पाहून, भारतीय निवडकर्त्यांनी त्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत प्रथमच टीम इंडियाचा भाग बनवले. ज्याबद्दल कपिल देव अनकट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलताना दिसले.

कपिल देव म्हणाले, उमरानच्या निवडीमुळे मी खूप खूश आहे. पण हे खूप लवकर आहे… या स्तरावरील कोणत्याही खेळाडूला तुम्हाला किमान दोन-तीन वर्षे द्यावी लागतील. मग तुम्ही ठरवू शकता, मात्र सर्वजण सुरुवातीला एखाद्या खेळाडूची खूप प्रशंसा करतात आणि एका वर्षानंतर तो गायब होतो. पण, उमराणमध्ये टॅलेंटची कमतरता नाही.

कपिल देव पुढे म्हणाले, उमरानने स्वत:ला चांगल्या वातावरणात ठेवावं आणि त्याची मेहनत सुरू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. त्याची क्षमता पाहता त्याच्यात कशाची कमतरता आहे असे मला वाटत नाही. पुढे जाण्यासाठी त्याला फक्त चांगल्या गोलंदाजांशी बोलणे आणि त्यांच्या गोलंदाजीचे व्हिडिओ फुटेज पाहणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. IPL २०२२ मध्ये १४ सामने खेळताना उमरान मलिकने २० च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या. या सीजनमध्ये त्याने गुजरातविरुद्ध २५ धावांत ५ विकेट घेतल्या, ही त्याची या सीजनमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

महत्वाच्या बातम्या-
वा रे पठ्या! उमरान मलिकने फेकला सगळ्यात वेगवान बॉल, शोएब अख्तरचा मोडला रेकॉर्ड
तुझे वडील आता फळे विकणे बंद करणार का? उमरान मलिकने दिले मन जिंकणारे उत्तर, म्हणाला
केएल राहूल बनला भारताच्या टी २० संघाचा नवा कर्णधार; उमरान मलिकसह ‘या’ नवोदितांना संधी
माझा विक्रम मोडता मोडता हाडे काडे मोडशील; शोएब अख्तरचा उमरान मलिकला टोला

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now