राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. तसेच त्याचे रोमांचकारी व्हिडिओही समोर येत आहे. (umesh vartak death bull race)
अशात अनेकजण बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. तसेच विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. बैलगाडा शर्यत ही खुपच जिकरीची असते कारण बैलाला सांभाळणं हे सोपं काम नसतं. त्यामुळे यातही अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे.
गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. मृतकाचे नाव उमेश वर्तक असे आहे. उमेश वर्तक हे अलिबाग पंचायत समितीचे सदस्य होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलगाडीच्या स्पर्धेत आपली गाडी पहिल्या नंबरवर असल्याचा आनंद उमेश वर्तक साजरा करत होते. असे असतानाच त्यांना दुसऱ्या बैलगाडीने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण अखेर त्यांचा मृत्यु झाला आहे.
दरम्यान, रायगडमध्ये २ फेब्रुवारीला एका बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तिथेही बैलगाडा शर्यतीत दुर्घटना घडली होती. एक बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर गेली होती. त्यामुळे या अपघातात तीन जण जखमी झाले होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.
रायगड जिल्ह्यातील मुरुडमधून नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. त्यावेळी बैलगाडा शर्यत सुरु होताच, बैलांची एकजोडी लोकांच्या अंगावर गेली होती.
महत्वाच्या बातम्या-
‘आमिर खान हा सच्चा देशभक्त, बायकोला सोडलं, पण देश नाही सोडला’, अभिनेत्याने उडवली खिल्ली
..जेव्हा ऋषी कपूरने डिंपलला दिलेले खास गिफ्ट राजेश खन्नाने समुद्रात फेकले होते, वाचा किस्सा
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय