Share

नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे अमरावतीत भरचौकात व्यवसायिकाची हत्या, राज्यात खळबळ

अमरावती येथील एका व्यवसायिकाची हत्या करण्यात आली आहे. उमेश कोल्हे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांनी धारदार शस्त्रांनी निर्दयीपणे ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ५ आरोपींना अटक केली आहे. (Umesh kolhe murder because of support nupur sharma)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच हत्येमागील नेमके कारण समजेल.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील क्लॉक टॉवरच्या मागे, अमित मेडिकल शॉपचे ऑपरेटर उमेश कोल्हे हे त्यांच्या मुला आणि सुनेसोबत दुकान बंद करून घरी परतत होते. त्याचवेळी तीन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात उमेश गाडीतून खाली पडले होते.

गुन्हा करून आरोपी पळून गेले. घटनेनंतर उमेशचा मुलगा आणि सून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना अटक केली होती.

तिघांची चौकशी केल्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली, मात्र हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खुनाच्या वेळी उमेशकडे ३५ हजारांची रोकडही होती. हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या रक्कमेला हात सुद्धा लावला नाही. आता या प्रकरणाचा नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे.

उमेश कोल्हे यांनी फेसबूकवर नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्यांच्या अनेक डॉक्टर मित्रांनी आणि औषध विक्रेत्यांनीही त्याला लाईक केले होते. आता नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल काही डॉक्टरांनी माफी सुद्धा मागितली आहे. नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर माफी मागतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

आता भाजप नेते तुषार भोसले यांनी सांगितले की, उमेश कोल्हे यांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ बाहेर पडल्याने त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पकडलेल्या आरोपींचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यांनी जाणूनबुजून हत्या केलो आहे. तसेच खासदार अनिल बोंडे यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ गंभीर आजारमुळे श्रृती हसन होतेय लठ्ठ, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती; ‘अशी’ झालीये अवस्था
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, आई- वडीलही त्यांना साथ देतात; मुलीचा व्हिडीओतून आरोप
अखेर तो दिवस आलाच! दिनेश कार्तिकला मिळाले टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद, हार्दिक पंड्याला डच्चू

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now