काही दिवसांपुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची (nana patole) एक क्लिप व्हायरल झाली होती ज्यानंतर राजकारणात खळबळ माजली होती. यामध्ये नाना पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा वापरली होती पण नंतर त्यांनीच असा खुलासा केला की मी गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो. त्यानंतर कथित गावगुंड मोदी म्हणजे उमेश घरडे (umesh gharde) समोर आला आणि त्याने मला मोदी म्हणतात असा खुलासा केला होता. (umesh gharade wife told about his husband)
पुर्ण महाराष्ट्रभर त्याचीच चर्चा सुरू होती. बायको सोडून गेली म्हणून लोक मला मोदी म्हणतात असा खुलासा उमेश घरडेने केला होता. पण त्याची पत्नी त्याला का सोडून याचाही खुलासा आता झाला आहे. तर गावगुंड मोदी म्हणजे उमेश घरडे यांच्या पत्नी सध्या त्यांच्या माहेरी राहतात. त्यांचं माहेर म्हणजे मांडळ या गावात राहतात.
अनेक वर्षे वडिलांच्या घरी राहिल्यानंतर त्या उमेश घरडेकडे पुन्हा राहायला गेल्या होत्या. पण त्याचं वागणं चांगलं नव्हतं. तो दारू प्यायचा आणि तिला मारायचा. एकदा तर पैशांसाठी त्याने बायकोचा गळा दाबला होता आणि तिला चाकूचा धाकही दाखवला होता. त्यानंतर त्याची बायको त्याला कायमची सोडून आली.
आता तिला तो घटस्फोट देत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा घरडे असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. २०११ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. त्या जेव्हा पहिल्यांदा गरोदर होत्या तेव्हाच त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. तो पत्नी शिव्या द्यायचा, त्यांना मारायचा आणि कोणाशीही भांडायचा.
जेव्हा त्याची पत्नी गावी गेली होती तेव्हा तिला उमेश घरडेची पत्नी म्हणून कोणच ओळखत नव्हतं. मोदीची बायको म्हणून तिला सगळे ओळखायचे. तिच्या नवऱ्याला गावात मोदी म्हणतात असे तिने सांगितले. नागपूरला जेव्हा ते भाड्याने राहायचे तेव्हा घरभाडे देत नव्हता, नोकरी करत नव्हता, दारू प्यायचा म्हणून मी त्याला सोडून आले.
चार पाच वर्षांपुर्वी जेव्हा आमची भांडणं झाली तेव्हा त्याने माझ्या काकूची झोपडी पेटवली होती. मजुरी करून मी माझ्या मुलीचं पोट भरते. तीन महिन्यांपुर्वी मी त्याच्याकडे गेले होते तेव्हा त्याने मला दारू पिऊन चाकू दाखवला होता आणि माझा गळाही दाबला होता. गटस्फोट मागितला तर देत नाही.
त्याने सासुरवाडीत अशी थाप मारली होती की त्याच्या घरी वाघाची चमडी आहे. ही थाप पुर्ण गावभर प्रसिद्ध आहे. उमेश घरडेचे अनेक कारनामे त्याच्या सासुरवाडीत प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्याने चुलत सासूची झोपडी जाळली होती. तो जेव्हा बायकोला मारत होता तेव्हा शेजारी राहणारी चुलत सासू त्याला समजवायला गेली होती.
याचा राग त्याच्या मनात होता. मग त्याने मध्यरात्री चुलत सासू म्हणजे योगिता बनसोड यांच्या झोपडीला आग लावली होती. त्यावेळी गावातील लोकांनी त्याची धुलाई केली होती. उमेश घरडे याने दारू पिऊन अनेकवेळा तमाशा केला आहे. आपल्या मेव्हणीच्या लग्नात तो पत्नीच्या मागे चाकू घेऊन लागला होता.
शेवटी त्याच्या अंगावर लग्नातली गरम कढी फेकली होती असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच्या बायकोनेही त्याच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका वृत्तसंस्थेला तिने ही माहिती दिली आहे. आता या सगळ्या खुलाशानंतर नाना पटोले खरंच या गावगुंडाबद्दल म्हणत होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच भाजपच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका वृत्तसंस्थेला तिने ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
Video: अल्लू अर्जुनची पत्नी गोवाच्या बीचवर करतीये धमाल, सोशल मिडीयावर व्हिडिओ झाले व्हायरल
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मला अजून 105 लेकरांची आई व्हायचयं; वर्षात 22 मुलांना जन्म दिलेल्या महिलेची वाचा अनोखी गोष्ट
१२० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी २४ तास पहारा देतात गावकरी; असं काय खास आहे त्यात