Share

शिवसेना अजूनही उद्धव ठाकरे यांचीच आहे; घटनातज्ज्ञ उल्हास बापट असे का म्हणाले?

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. अशात ३० तारखेला विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून त्यामध्ये बहुमत चाचणी होणार आहे. (ulhas bapat on cm uddhav thackeray)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी यावर अभ्यासपूर्व मत मांडले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल हे केंद्राचे नोकर नसतात, ते राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना काम करावे लागते, हे घटनेत स्पष्ट आहे. फक्त काही निर्णयच ते घेऊ शकतात. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून वाईट वाटते की राज्यपाल पदाचा सध्या गैरवापर केला जात आहे, असे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

राज्यपालांना काम करताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसारच वागावे लागते. तसेच विधानसभेच सत्र बोलवणे आणि सत्र संपवणे याबाबत मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच त्यांना निर्णय घेता येतो. असे असतानाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्या अधिवेशन बोलावले आहे. हे घटनाबाह्य आहे, असेही उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

राज्यपालांची ही भूमिका साफ चुकीची आहे. शिवसेना अजूनही उद्धव ठाकरे यांचीच आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल जी भूमिका घेताय जर ती संशयाची असेल तर हा राजकारणाचा विजय आहे. त्यांनी अनेकवेळा राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे. १२ आमदारांची निवड आणि पहाटेचा शपतविधी हे सुद्धा राज्यघटनेचे उल्लंघन आहे, असे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी दिल्यानंतर भाजप नेते सक्रीय झाले आहे. सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलावली होती. त्यानंतर ते राज्यपालांच्या भेटीला पोहचले होते आणि बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: गोविंदाच्या गाण्यावर थेट आयर्लंडमध्ये थिरकली चहलची पत्नी धनश्री, नेटकऱ्यांनीही केलं कौतुक
साऊथला मागे टाकण्यासाठी सज्ज आहेत बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार, येणार एकामागून एक १८ चित्रपट
काशी विश्वनाथाच्या मंदीरातील साईबाबांच्या मुर्त्यांना महंतांचा विरोध; जाणून घ्या यामागील कारण…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now