Share

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, भाजप-शिंदे सरकार कोसळणार; समोर आली मोठी माहिती

Eknath Shinde Devendra Fadanvis

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेना या पक्ष नावावर आणि चिन्हावर दावा सांगितला होता. याची सुनावणी शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून पार पडली आहे.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ३० जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला आहे. या सुनावणीनंतर नेते, कायदेतज्ज्ञ यावर प्रतिक्रिया देत आहे.

आता या सुनावणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काही कायदेशीर बाजूही समजावून सांगितल्या आहे. पक्षांतर्गत बंदी कायद्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हे सरकार अपात्र ठरेल. त्यामुळे हे सरकार पडू शकते, असे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

सध्या दोन ठिकाणी या प्रकरणाचा निकाल लावला जात आहे. एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय. निवडणूक आयोग ही घटनात्मक संघटना आहे. राज्यघटनेनुसार आयोगाला खुप अधिकार दिले गेलेले आहे. सध्याचं प्रकरण हे कलम ३२४ अंतर्गत सुरु आहे.

पक्षात दोन गट पडले तर कोणत्या गटाला मान्यता द्यायची? हे निवडणूक आयोग ठरवतं. पण इथे अडचण अशी आहे की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी जर आयोगाने कुठलाही निकाल दिला तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्यामते हे हास्यस्पद ठरु शकते, असे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यघटनेचं दहावं शेड्युलनुसार, दोन तृतीयांश लोक एकाचवेळी बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात सामील झाले तर ते वाचतात नाहीतर ते अपात्र ठरतात. त्यामुळे सुरवातीला शिवसेनेतून बाहेर पडलेले १६ आमदार हे दोन तृतीयांश नव्हते. तसेच ते दुसऱ्या पक्षातही सामील झाले नाही, त्यामुळे ते अपात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे, असे बापट यांनी म्हटले आहे.

तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना मंत्री राहता येणार नाही. त्यामुळे हे सरकार पडण्याची शक्यता जास्त आहे. तसेच सोळा आमदार अपात्र ठरले तर बाकी आमदारही अपात्र ठरुन हे सरकार कोसळेल, असेही उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात सापडला आजवरचा सर्वात मोठा ‘खजिना’, क्षणात संपेल संपुर्ण देशाची गरीबी
दुसऱ्या वनडेपुर्वी टिम इंडीयाला ICC चा मोठा दणका; रोहीत शर्माचे कर्णधारपद धोक्यात
महीलेने ब्रेकऐवजी दाबला ॲक्सीलेटर, पुढे जे घडलं ते अतिशय भयानक होतं; पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now