रशियाच्या हल्ल्याने हादरलेल्या युक्रेनने चाणक्य आणि महाभारताचा संदर्भ देत भारताला मदतीचे आवाहन केले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. राजधानी कीवमध्येही स्फोट होत असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. अशा संकटाच्या वेळी युक्रेनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. (ukraine want help from pm modi)
रशिया-भारताचे जुने संबंध आणि पंतप्रधान मोदींची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी असलेली जवळीक पाहता, युक्रेनला हे युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुढे यावे असे त्यांना वाटते. यासंबधी युक्रेनच्या राजदूताने पत्रकारांनी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे.
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा म्हणाले की, महाभारत आठवा. काही अहवालांनुसार, ही लढाई तीन हजार वर्षांपूर्वी लढली गेली होती. महाभारताच्या युद्धापूर्वीही शांततेसाठी अनेक प्रयत्न झाले. दुर्दैवाने महाभारतातील शांततेसाठीचे ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, परंतु मला आशा आहे की अशा चर्चा या प्रकरणात यशस्वी होतील.
नवी दिल्लीत असलेल्या युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पुतीन यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करताना रशियन राजदूत म्हणाले की, भारताचे रशियाशी वेगळे नाते आहे. परिस्थिती बिघडण्यापासून वाचवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आम्ही पंतप्रधान मोदींना आवाहन करतो की, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष झेंस्की यांच्यात त्वरित चर्चा करुन द्यावी.
ते म्हणाले की, युक्रेन हा भारतासारखा लोकशाही देश आहे. मी भारतातील राजदूत आहे. भारत आमच्यासाठी खास आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य व्हायचे आहे. भारत हा जगातील अत्यंत प्रभावशाली देश आहे. चाणक्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी तुमचा इतिहास वाचला आहे. २४०० वर्षांपूर्वी येथे चाणक्य घडले. जेव्हा युरोपात सभ्यता नव्हती तेव्हा भारतात विद्वान होते.
ते म्हणाले की, आज युक्रेनमधील परिस्थिती खूप बदलली आहे. शेवटपर्यंत आमचे राष्ट्राध्यक्ष रशियाशी द्विपक्षीय चर्चेची मागणी करत राहिले पण प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या देशात बॉम्बस्फोट होत आहेत. रशिया सीमा भागात युक्रेनच्या चेकपोस्टवर हल्ला करत आहे.
इगोर पोलिखा यांनी सांगितले की, युक्रेनच्या अनेक लष्करी भागांवर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. लष्करी विमानतळ, लष्करी भागांना बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी लक्ष्य जात आहे. काही हल्ले राजधानीच्या उपनगरातही झाले आहेत. काही हल्ले युक्रेनच्या सीमेच्या आतही झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ रांगेत; पहा कोण आहेत ‘ते’ १२ जण
किंग खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण अभिनयाच्या ऐवजी करणार ‘हे’ काम
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने संपवले जीवन; सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर