Share

झुकेंगे नहीं! देशाला वाचवण्यासाठी १३ युक्रेनियन सैनिक शेवटपर्यंत गेले नाही शरण, हसत-हसत दिला जीव

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान खूप धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना युक्रेनच्या स्नेक आयलंडमधून समोर आली आहे. शरण येण्यास नकार दिल्याने रशियाने १३ युक्रेनियन सैनिकांचा जीव घेत हे बेट ताब्यात घेतले आहे. जेव्हा रशियन युद्धनौकेवरील सैनिकांनी १३ सीमा रक्षकांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला, त्यानंतर त्यांना रशियन सैनिकांनी ठार केले. सैनिकांच्या शौर्यासाठी युक्रेनने त्यांना हिरो ऑफ युक्रेनचा सन्मान दिला आहे. (ukraine 13 army man death)

स्नेक आयलंड, ज्याला झमीनी आयलंड देखील म्हणतात, तो ओडेसाच्या दक्षिणेस काळ्या समुद्रात आहे. रशियन युद्धनौका तेथे पोहोचली आणि त्यांनी हल्ला करण्याची धमकी दिली आणि आत्मसमर्पण करण्यास सांगितले. यावर तेथे उपस्थित असलेल्या सीमा रक्षकांनी शौर्य दाखवत आव्हान दिले.

त्यानंतर युद्धनौकेत उपस्थित युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैनिकांना शिवीगाळ करत अवहेलना केली आणि आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. यानंतर रशियन सैनिकांनी त्यांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन नौदलाने मॉस्क्वा आणि वॅसिली बायकोव्ह युद्धनौका बेटाच्या दिशेने पाठवल्या. बेटावरील सैनिकांना प्रथम डेक गनने धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर त्यावर रशियन सैनिक पाठवून हे बेट ताब्यात घेतले.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे की, रशियाने युक्रेनचे स्नेक बेट ताब्यात घेतले आहे. तेथे उपस्थित असलेले १३ सीमा रक्षक शहीद झाले आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता. त्यांना हिरो ऑफ युक्रेन हा सन्मान देण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला. यामध्ये कीववर सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यानंतर आता रशियन सैन्य कीवमध्ये पोहोचले आहे. युक्रेनच्या लष्कराचे म्हणणे आहे की, ते राजधानी कीवच्या बाहेर रशियन सैन्याशी लढत आहेत. रशियाला रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने कीवजवळील पूलही उडवून दिला आहे.

रशियाने आपल्या १३७ नागरिकांची हत्या केल्याचा युक्रेनचा दावा आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत. रशिया निवासी भागांना लक्ष्य करत असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. युक्रेन संघर्षाच्या दरम्यान कमकुवत दिसत आहे, परंतु त्याने हार मानली नाही.

महत्वाच्या बातम्या-
‘पळून जायला गाड्या कसल्या पाठवताय शस्त्रे पाठवा’, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला ठणकावले
..पण ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते, अमृता फडणवीसांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून श्रीदेवीने बोनी कपूर यांना बांधली होती राखी, नंतर त्यांच्याशीच केलं लग्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now