Share

सत्तासंघर्षाची सुप्रीम सुनावणी संपली, कोर्ट काय निकाल देणार? उज्वल निकम म्हणाले, माझ्या मते..

uddhav thackeray ujjawal nikam eknath shinde

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागच्या तीन आठवड्यांपासून सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील ठाकरे आणि शिंदे गटांचा युक्तिवाद आज संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लगेच निर्णय न देता निर्णय राखून ठेवला आहे.

मात्र आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यासोबतच सर्वसामान्य लोकांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षाच्या चाललेल्या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की “गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांतील सत्तासंघर्षाची जोरदार चर्चा सुरू आहे, यात काहीच शंका नाही.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना काही अडचणीचे ठरणारे प्रश्नही विचारले, त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन हा त्यामागचा उद्देश होता.

मात्र काल सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या एका कृतीला चांगलेच फटकारले. तथापि, ते त्यावेळी नोंदवल्याप्रमाणे त्यांचे मत होते. त्याचा निकालावर परिणाम होईल का? हे मात्र सध्या लगेच सांगता येणार नाही, असे उज्ज्वल निकम यांनी सांगीतले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मला वाटते या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात दोन सर्वात जास्त महत्त्वाचे मुद्दे असतील, एक म्हणजे राज्यपालांनी घेतलेली भूमिका आणि दुसरा म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेचा वादग्रस्त मुद्दा. त्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणाला मिळेल, हे आताच लगेच सांगता येणार नाही.

घटनेनुसार हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे त्यांना हा अधिकार मिळतो की सर्वोच्च न्यायालय यावर वेगळी भूमिका घेणार हे पाहावे लागेल.  कदाचीत सुप्रीम कोर्ट देखील राज्यपालांना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी प्रो-टेम स्पीकर नियुक्त करण्याचे निर्देश देऊ शकते.”

“राज्यपालांच्या भूमिकेवर निकाल देताना, जर राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून गैरसमज झाला असेल. त्यामुळे आता घड्याळाचे हात उलटे करता येतील का? कारण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पुन्हा ठाकरे सरकार स्थापण करता येईल का?

सर्वोच्च न्यायालयासमोरील ही सर्वात मोठी घटनात्मक पेच आहे. त्यामुळे माझ्या मते हे संपूर्ण प्रकरण कायदेशीर गुंतागुंतीचे झाले आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. असेही जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी मत मांडले.

महत्वाच्या बातम्या
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
शिंदेगटात जाताच माजी मंत्री सावंतांनी फोडलं ठाकरेंचं ‘ते’ गुप्त पत्र; सगळंच काढलं बाहेर
शिंदेगटात जायचं वडिलांना मान्य होतं का? देसाईंच्या मुलाने थेटच सांगीतलं घरात नेमकं काय झालं

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now