महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. देसाईंच्या या पाऊलामुळे ठाकरे गटावर (Thackeray Group) एक प्रकारे मानसिक दडपण आल्याचे बोलले जात आहे.
त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे बोलल जात आहे. भूषण देसाई यांनी सोमवारी (दि.१३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
तसेच माजी मंत्री सुभाष देसाई हे देखील भविष्यात शिंदे गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवली. मात्र, ही शक्यता खुद्द सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर देत धुडकावून लावली आहे. भूषण देसाई यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. शिवसेना या दोन शब्दांना सोडून मला दुसरे कोणतेही नाव दिसत नाही. माझं जे काही सामाजिक कार्य होते ते मी करत होतो. पण शिंदे साहेबांचं काम पाहून मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे वडिलांची चर्चा करून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, गेली कित्येक वर्षांपासून मी त्यांच काम पाहतोय. या अगोदरच मी माझ्या वडिलांशी या संदर्भात बोललो आहे. त्याचवेळी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मी शिंदे गटात प्रवेश करणार हे ठरलं होतं. आमच्या घरामध्ये कोणताही मतभेद नाही. त्यामुळे मला फार विचार करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे.
यादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भूषण देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भूषण देसाई म्हणाले की, त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे. मी त्या काळात काम केलं आहे. माझं सामाजिक काम आहे ते त्यांना कळेल. मी निवडणुकीसाठी इथं आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार आहे, असं म्हणत भूषण देसाई यांनी पटलावार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘भाजपचे आधी देसाईंच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप, आता त्यांना वाॅशिंग पावडरमध्ये धुणार का?’
‘वयाच्या या टप्प्यात मी खूप काही…’; मुलाने शिंदेगटात प्रवेश करताच सुभाष देसाईंची धक्कादायक प्रतिक्रीया
चिमुकल्याने लहान भावाच्या बर्थडेला केलेला जुगाड पाहून पाणावतील डोळे; भाकरीवर मेणबत्ती पेटवत…