प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. यात प्रवीण तरडे मुख्य भुमिकेत दिसून आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. (ujjawal nikam on sarsenapati hambirrao)
सर्वजण या चित्रपटाचे कौतूक करत आहे. असे असताना आता सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी हा चित्रपट बघितला आहे. त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तिथे उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पद्मश्री. मा. श्री उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील भारत सरकार यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरिता ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर योद्धांचे आज पुन्हा एकदा स्मरण. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने ते निश्चित होते. खरोखर या चित्रपटातील कलाकारांनी प्राण ओतून काम केले आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
तसेच मला हा चित्रपट बघताना असं वाटत होतं की, आपण त्या पूर्वीच्या काळात गेलो आहे. जय भवानी, जय शिवाजी आणि शिवाजी महाराजांची आठवण येतेय. या चित्रपटाच्या निर्मात्यांना, कलाकारांना आणि दिग्दर्शकांना खूप खूप धन्यवाद, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियासोबतच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने फक्त तीनच दिवसांत ८.७१ कोटींचा गल्ला जमा केला होता. अनेक चित्रपट समिक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतूक करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
‘सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात व्यस्त आहेत’, अजित पवारांचा भाजपला टोला
‘या’ चार बोल्ड वेबसिरीजने घातलाय धुमाकूळ, चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका, नाहीतर होईल फजिती