Share

Udyanraje bhosale : नादच खुळा! कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंनी तोंडाने भरवला पेढा, व्हिडीओ व्हायरल

Udyanraje bhosale : भाजपा खासदार उदयनराजे भोसले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते त्यांच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते सातारा येथील गोडोली येथे कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला गेले होते.

तेव्हा त्यांनी अनोख्या पद्धतीने कार्यकर्त्याला पेढा भरवला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. सध्या या व्हिडीओची सोशल मिडीयावर जौरदार चर्चा सुरू आहे. गोडोली येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी त्यांचा जंगी वाढदिवस साजरा केला.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्या कार्यकर्त्याला आपल्या तोंडातून अनोख्या पद्धतीने पेढा भरवला. यावरून त्यांचे कार्यकर्त्यांवरचे प्रेम आणि लोकप्रियता यावेळी दिसून आली. याआधीची त्यांचे कार्यकर्त्यांसोबतचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरून फिरणे, कॉलर उडविणे, कार्यकर्त्याच्या वाढदिवशी त्याची पप्पी घेणे अशा अनेक अदा त्यांच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. त्यानंतर आता त्यांचा कार्यकर्त्याला तोंडातून पेढा भरवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहरातील गोडोली येथे कार्यकर्ते विनोद मोरे यांच्या वाढदिवसाला गेले होते.

त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे कौतुक केले. कौतुक केल्यानंतर त्यांनी स्वताच्या तोंडातून पेढा भरवला. काही जणांनी हा व्हिडीओ शुट केला आणि सोशल मिडीयावर प्रसारित केला. त्यानंतर हा व्हिडीओ सातारा आणि अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या शिंदे गट आणि शिवसेनेबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले की, शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. यामधून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे.

उदयनराजे म्हणाले की, शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे. शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.

पुढे उदयनराजे म्हणाले की , लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे. इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या
Baba Venga: २०२२ मध्ये भारतावर येणार ‘हे’ मोठे संकट, बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी
Karan Mehra: करण मेहराने निशा रावलच्या ज्या भावाला तिचा बॉयफ्रेंड सांगितले त्यानेच केली पोलखोल, म्हणाला..
Shahnaz Gill: सिद्धार्थला विसरली शहनाज गिल, आता ‘या’ अभिनेत्याच्या पडलीये प्रेमात? चर्चांना उधाण
(Monsoon sessions)दरवाजे अद्यापही खुले आहेत पण..; बंडखोर आमदारांसमोर आदित्य ठाकरेंनी ठेवली ‘ही’ अट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now