Share

केंद्रीय यंत्रणांनी थेट ‘मातोश्री’लाच घेरले; चारही बाजूंनी केली कोंडी, ठाकरेंची ‘ही’ खास माणसं रडारवर

aditya udhav thackeray

गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे आता केंद्रीय यंत्रणांनी थेट ‘मातोश्री’लाच घेरल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता थेट मातोश्रीला घेरत एकाच दिवासात विक्रमी पद्धतीनं धाडी टाकण्यात आल्यात. केंद्रीय यंत्रणांनी फक्त उदधव ठाकरेच नाहीत तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या जवळच्या माणसांवरही धाडी टाकल्या आहेत. तसेच अनिल परब यांची विश्वासू समजली जाणारी दोन माणसंही इनकम टॅक्सने धाडी पडल्या.

तर जाणून घेऊया.. शिवसेनेच्या आतल्या गोटातली कोणकोणती माणसं यंत्रणांच्या रडारवर आली आहेत. मंगळवारी शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली.

राहुल कनाल हे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहे. राहुल कनाल हे युवासेना कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्याच्याकडे शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त पद देखील आहे. 2019 च्या वेळेस आदित्य ठाकरेंसाठी एक टीम तय़ार करण्य़ात आली होती त्या टीमचे राहुल कनाल हे सदस्य आहेत.

मंगळवारी प्राप्तीकर खात्याने संजय कदम यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहेत. ते अंधेरी पश्चिम विभागाचे शिवसेना संघटक आहेत. तसेच संजय कदम हे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचे समजते.

तसेच अनिल परब यांचे आणखी एक निकटवर्तीय मानले जाणाऱ्या बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. आरटीओ घोटाळा प्रकरणी पहिल्यांदा बजरंग खरमाटे यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी 2021 मध्ये आरटीओचे अधिकारी असणारे खरमाटे यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची 8 तास चौकशी केली होती. खरमाटे हे परब यांच्या जवळचे अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ सुरु असलेल्या या धाडसत्रांमुळे शिवसेना कोंडीत सापडणार का, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत त्यांच्या पत्नी हे सारे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले होते. भावना गवळी, प्रताप सरनाईकही यंत्रणांच्या हिटलिस्टवर होते. ठाकरेंच्या खास माणसांना घेरण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाचा स्टार खेळाडू करणार लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘ही’ धाकड गर्ल?
मृत्यूपुर्वी मसाज करणाऱ्या महीलांसोबत होता शेन वाॅर्न; सीसीटिव्ही फुटेजमधून झाला वेगळाचा खुलासा
बलात्कार प्रकरणात आरोपी न करण्यासाठी 37 लाखांची मागितली लाच, पोलिसाला रंगेहाथ अटक, असा रचला सापळा
सोपं नव्हतं अनुपम खेर बननं; अभिनयासाठी केली चोरी, आईचा मार खाल्ला, अनेक रात्री काढल्या उपाशी

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now