राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत अख्ख ठाकरे सरकार धोक्यात आणलं. या काळात अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अन् शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.
मात्र असं असलं तरी देखील काही आमदार असे आहेत की, त्यांनी या कठीण काळात देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाहीये. एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे.
या निष्ठावंत आमदारांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद मानले आहे. उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवून त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे. तसेच या पत्रात उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावंत आमदारांचे धन्यवाद मानले आहे.
वाचा काय म्हंटलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रात..?
कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले आहे. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ हीच प्रार्थना, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांचे आभार मानले आहे. सध्या हे पत्र सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे.
आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.
वाचा कोण आहेत ते निष्ठावान आमदार..?
आज उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
चुकीला माफी नाही! गद्दार आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी; बांगर म्हणाले…
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल