politics महाराष्ट्राचा राजकारणात शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी घडून आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार कोसळले. आता उद्धव ठाकरे स्वकीयां विरोधातच पक्ष चिन्हासाठी कोर्टाची लढाई लढत आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले. या मोठ्या धक्क्यातून शिवसैनिकांना सावरण्यासाठी तसेच मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये आलेले नैराश्य झटकून टाकण्यासाठी मोठा राजकीय डाव टाकण्याची शिवसेनेकडून तयारी सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांना थेट राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांच्या रांगेत बसवण्याच्या दृष्टीने शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर भाजपचे विरोधी म्हणून शरद पवार, अखिलेश यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांची नावे आहेत. त्याच यादीत आता उद्धव ठाकरे यांचा सुद्धा समावेश करण्याच्या दृष्टीने शिवसेनेकडून पावले टाकली जाणार आहेत, अशी माहिती एका सेना नेत्यानेच सूत्रांना दिली.
भाजपच्या हुकूमशाही राजकारणाचा बळी ठरलेले उद्धव ठाकरे, अशाप्रकारे जनतेसमोर ठाकरेंची प्रतिमा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची त्यांना मोठी सहानुभूती मिळेल. आणि भाजप विरोधक म्हणून मोठ्या स्तरावर उद्धव ठाकरेंना पोहोचता येईल, अशा प्रकारची चर्चा देखील अंतर्गत वर्तुळात सुरू असल्याचे त्याने सांगितले. यावरून शिवसेना आता व्हिक्टीम कार्ड वापरणार असल्याचे दिसते.
मोगलांच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचे तख्त हादरवले होते. त्याचप्रमाणे आताही दिल्लीला हादरा बसेल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपकडून होत असल्याने त्यांच्या विरोधात मोठा रोष सामान्य जनतेमध्ये आहे. त्यामुळे सामान्य जनमत त्यांच्या विरोधात जाईल, असा दावा त्या शिवसेना नेत्याने केला.
अंधेरी पूर्व निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून धनुष्यबाणावर दावा सांगितला जाणार आहे. शिवसेना आता शिंदे गटाविरोधात दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर लढाई तयार असल्याचे त्याने सांगितले. त्या काळात शिवसेना राजकीय भूमिका घेते शिंदे आणि ठाकरे वादाला कोणते वळण मिळणार? तसेच पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार? हे येत्या काळात पहावे लागेल.
मात्र उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर दोन मुद्द्यांवर काम करावे लागेल. एक म्हणजे शिंदे गटा विरोधात कायदेशीर लढाई सोबतच शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवा जोश निर्माण करावा लागेल. नवी मोठी राजकीय खेळी करत नव्या जोशाने उभारी घेण्याच्या दृष्टीने पावले टाकावी लागतील, असे मत राजकीय तज्ञांनी नोंदवतात.
महत्वाच्या बातम्या-
Atul Bhatkhalkar : मृत्यूदिनीही महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे मुलायमसिंगांवर टिकास्र; श्रद्धांजली देताना म्हणाले कारसेवकांवर गोळ्या झाडणारे…..
Sharad pawar : ‘या’ निवडणूकीत पवारांनी अचानक भाजपच्या शेलारांसोबत केली युती, समीकरण बदलणार
politics : ‘आता शिवसैनिक आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याला शिंदे गट आणि भाजप जबाबदार’