गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घटना घडताना पाहायला मिळत आहेत. अनेक शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यामुळे महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेला मोठा धक्का बसला.
असं असलं तरी काही आमदार हे अजूनही एक निष्ठपणे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर. संतोष बांगर यांनी आता बंडखोर आमदारांना परत उद्धव ठाकरेंकडे येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांना अश्रु देखील अनावर झाले.
मुंबईहून शुक्रवारी सकाळी संतोष बांगर हे पुन्हा हिंगोलीत परतले. यावेळी बांगर यांचे शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घातली. ‘उद्धवसाहेबांकडे परत या..! साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ करतील,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना बांगर यांनी म्हंटलं आहे की, ‘सर्व आमदारांना माझी कळकळीची विनंती आहे की, ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत.’
बांगर यांना यावेळी अश्रु अनावर झालेले पाहायला मिळाले. पुढे बोलताना बांगर यांनी म्हंटलं आहे की, ‘एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, तुम्ही सगळे एकत्र या. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका.’
दरम्यान, ‘अंगावरचा भगवा हटला तर आम्ही काहीच नाही. कितीही ऑफर आल्या तरीही बळी पडणार नाही. माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण असल्याच संतोष बांगर यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजूनही शिंदे यांची नाराजी दूर झालेली नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे परत या म्हणणाऱ्या शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नक्की काय घडलं?
‘मुख्यमंत्र्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला, राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’; शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे आरोप
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे आक्रमक
“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार