गेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेले बंड एकनाथ शिंदेंच बंड अखेर गुरुवारी संपलं. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अन् महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
काल आणखी एक राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केली आहे. याबाबतचे पत्र व्हायरल झाले होते. यामुळे पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या शिंदे यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी मोठी कारवाई केली असल्याच बोललं केलं.
मात्र आता एक वेगळी माहिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या त्या पत्रात इंग्रजीमध्ये मजकूर छापलेला आहे. याशिवाय मजकूरमध्ये व्याकरणाच्या देखील चुका आहेत. यामुळे आता ते व्हायरल झालेलं पत्र पत्र खरं की खोटं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटवत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. याशिवाय शिंदे यांनी पक्षाविरोधात काम केल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. या पत्राबाबत शिवसेना नेत्यांना देखील विचारण्यात आलं.
मात्र, या पत्राबाबत शिवसेनेचे पदाधिकारी, नेत्यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं आहे. याशिवाय शिवसेनेकडूनही या पत्राबाबत कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यामुळे या व्हायरल पत्राविषयी आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप खरी माहिती समोर आलेली नाहीये.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं ही वेळ आल्याचं ठाकरे राजीनामा देताना म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचे निरोपाचे शेवटचं भाषण तुमच्या पोरा बाळांना दाखवा, कारण…
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे ‘धर्मवीर’ चित्रपटाचा मोठा हात; चित्रपटात नेमकं असं काय होतं वाचा सविस्तर
एक साधा रिक्षाचालक कसा बनला राज्याचा मुख्यमंत्री? जाणून घ्या एकनाथ शिंदेंचा संघर्षमय प्रवास