एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का नाही दिलं? उद्धव ठाकरेंनी सांगितला पवारांसोबतचा ‘तो’ किस्सा

आज अखेर उद्धव ठाकरे लाईव्ह आले आणि तेव्हा ते भावनिक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी शिवसेनेत चाललेल्या बंढखोरीबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचा एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, असं ठरल्यानंतर तीन पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचं ठरलं. त्यानंतर शरद पवारांनी मला बोलावलं आणि ते म्हणाले की, तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. मी त्यांना म्हणालो, पवार साहेब काय मस्करी करता का? मी महापालिकेत फक्त महापौरांना शुभेच्छा द्यायला गेलो.

नगरसेवक नसताना मी कसा मुख्यमंत्री होणार असं त्यांना म्हणालो. त्यावर पवार म्हणाले की, तुम्हीच जबाबदारी घ्या. ठीक आहे, घेतो म्हटलं, असा किस्सा उद्धव ठाकरेंनी सांगितला. त्यामुळे एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का झाले? असा प्रश्न अनेकांना पडला होता त्याचे उत्तर मिळाले आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे भावनिक होत म्हणाले, माझेच लोक माझ्यावर अविश्वास दाखवतात. मी वर्षा सोडून मातोश्रीवर जायलाही तयार आहे. मी राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो, बंडखोर आमदारांनी ते राज्यपालांनां द्यावं अशीही अट त्यांनी बंडखोर आमदारांना घातली. राज्यपाल म्हणाले, उद्धव ठाकरेंनी स्वता यावं तर मी यायला तयार आहे पण मला कोरोना झाला आहे.

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना अट घातली. ते म्हणाले की, बंडखोर आमदारांनी सांगितलं तर मी आता राजीनामा देतो. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदाने मान्य आहे. मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. तुम्हाला जर वाटत असेल मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी मी नालायक आहे तर मी मुख्यमंत्रीपद सोडायलाही तयार आहे.

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीला माझ्यावर अजूनही विश्वास आहे. पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री झालो. चर्चा करायला समोरा समोर या असं बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करायला तयार आहे.

फक्त बंडखोरांनी सांगावं, लगेच राजीनामा देतो, मुख्यमंत्रीपद सोडतो. फक्त माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची वेळ आणू नये. एकाने जरी माझ्याविरोधात मतदान केलं तर ती लाजीरवाणी गोष्ट आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आता यावर बंडखोर आमदार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेवरही सगळ्यांचे लक्ष राहिल.

महत्वाच्या बातम्या
..तर मग आज अजय देवगणच्या पत्नीचे नाव काजोल नसते, शोमू मुखर्जींनी ठरवलं होतं ‘हे’ नाव
”तुम्हीच सांगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळायला नालायक आहे, लगेच पद सोडतो”
पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा; शिवसेनेने आमदारांना धाडली नोटीस
एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा ‘तो’ वाद पक्षाला भोवला, दोन दिवसांपूर्वीच पडली वादाची ठिणगी