राज्यात भाजपला डावलून शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार हे धोक्यात आलं आहे. याचबरोबर आता ठाकरे सरकार पडणार असल्याची चिन्हे देखील दिसू लागली आहे.
ठाकरे सरकारमधील काळात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण..! सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी पसरली. तर आता एकनाथ शिंदेंचा गट भाजप सोबत जाऊन राज्यात सत्तेत येणार असल्याच बोललं जात आहे. त्याचवेळी आता उद्धव ठाकरेंनी सांगितलेला एक किस्सा पुन्हा व्हायरल होत आहे.
दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते लाँच करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्री वरचा एक किस्सा सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. म्हणाले, आनंद दिघे हे ‘झुकेंगा नही साला’ असेच होते.
हिम्मत असेल तर समोर या, हिम्मत असेल तर टक्कर दे असे आनंद दिघे होते. तसेच बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आनंद दिघे होते, तसा माणूस आणि शिवसैनिक पुन्हा होणे नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी आनंद दिघे यांच्याबाबत बोलत होते. पण बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंना ओरडायचे, याबाबत त्यांनी एक किस्सा सांगितला.
यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यामधील एक किस्सा सांगून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाले, आनंद दिघे यांचं नाव घेतल्यावर सगळे दिवस आठवत आहे. बाळासाहेब हे आनंद दिघे यांच्यावर वेळेबाबत नेहमी रागवत असायचे.
बाळासाहेब हे वेळ पाळणारे होते. मात्र, आनंद दिघे यांना सकाळी 11 ची वेळ दिली असेल तर 2 वाजेपर्यंत त्यांचा काही पत्ता नसायचा. मग 2 वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. यामुळे बाळासाहेब आनंद दिघे यांच्यावर सतत रागवायचे. बाळासाहेबांसमोर उभे असल्यावर आनंद दिघे एका शब्दाने काही बोलत नव्हते. समोर आल्यानंतर त्यांचा राग वाहून जायचा आणि त्यांचं प्रेम पाहण्यास मिळायचं असा हा त्यांच्यातील गंमतीशीर भाग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांवर देखील निशाणा साधला. म्हणाले, चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिष्य असं हे नातं जपणारा हा एकमेव पक्ष असणार आहे. ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली, असे ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..
शिंदे गटातून मोठी माहिती समोर, केसरकरांनी सांगितले तीन महत्वाचे मुद्दे
गुजरातमध्ये दारूबंदी म्हणून आमदारांना गुवाहटीला हलवलं, दारूचं बिल थकलं? चर्चांना उधाण
माझी मान कापली तरी मी गुवाहटीत जाणार नाही, ईडीचं समन्स आल्यानंतरही राऊत ठाम





