गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची चर्चा सुरु होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत नक्की काय बोलतील याबाबतही चर्चा होत होती. आता बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे. (uddhav thackeray talk about nupur sharma)
या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. सघ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा वाद सुरु आहे. त्यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. नुपूर शर्मा यांच्यामुळे अरब आणि इस्लामिक देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी नुपूर शर्मासह भाजपला सुनावलं आहे.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. मात्र धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर आला तर प्रत्युत्तर दिलं जाईल.
नुपूर शर्मांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्या कुणीतरी भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अवमान केला. आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्रेषितांचा अवमान करण्याची गरज काय होती? त्यानंतर अरब देश एकत्र आले त्यांनी माफी मागण्याची मागणी केली.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, या प्रकरणावरुन भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावलाय. गुन्हा भाजपच्या प्रवक्त्याने केलाय, मग त्यासाठी देशाची नामुष्की कशाला. देशाने का माफी मागायची? भाजपची भूमिका देशाची भूमिका असू शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढावतेय.
दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबावरही भाष्य केले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाबरी पाडायला मी गेलो होतो म्हणणाऱ्या फडणवीसांची मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह केली पोलखोल; म्हणाले…
१२ वी नापास झाले असाल तर टेन्शन घेऊ नका, ‘हे’ कोर्स करा अन् बक्कळ पैसे कमवा; जाणून घ्या सविस्तर…
हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो