अखेर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा पार पडली. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागलं होतं. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली.
वाचा ‘मास्टर’ सभेत उद्धव ठाकरेंनी मारलेले प्रमुख टोमणे…
उद्धव ठाकरे म्हणतात, ‘फडणवीस म्हणतात बाबरीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते नव्हतेच. मी गेलो होतो. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा शाळेची सहल गेली होती का तिथे? तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमच करायला लागले नसते, असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी भाजपला टोमणा मारला.
पुढे ठाकरे म्हणाले ‘आता दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणाला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे ईडी वगैरे मागे लागले असतील. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील, असा टोमणा त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष केलं आहे. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणतात, ‘भगवी शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. तसा लोचा या सद्याच्या बाळासाहेबामध्ये झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. फिरू द्या अशा बाळासाहेबाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, ‘आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
या मुन्नाभाईच्या डोक्यात केमीकल लोच्या झालाय, फिरू द्या त्याला; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
पं. शिवकुमार शर्मांच्या जळत्या चितेसमोर गुमसूम झालेला दिसला दिग्गज कलाकार, फोटोने सर्वांनाच रडवले
राज ठाकरे आणि आनंद दिघेंचा हॉस्पिटलमधला शेवटचा संवाद व्हायरल; हिंदुत्वावर बोलताना म्हणाले होते की…
पठ्याने मातीपासून बनवला चक्क कुलर, ना वीजबिल ना पर्यावरणाची हानी, वाचा कसा केला हा आविष्कार