हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

सध्या कोल्हापूर पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. प्रामुख्याने या निवडणुकीत भाजप विरुद्ध कॉंग्रेस लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या सर्वच पक्षांनी कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी लक्ष केल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला?,’ असा सवाल त्यांनी बोलताना उपस्थित केला. तसेच नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे, असे ठाकरे म्हणाले.

याचबरोबर पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, ” असा घणाघात ठाकरेंनी भाजपवर केला.

तसेच ‘महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणारच, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मर्दाने मर्दासारखे लढलं पाहिजे, ते कोल्हापूरकरांकडून शिकलं पाहिजे. 2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही?, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही, असे ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
4 दिवसांपूर्वीच शिजला कट; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती आली समोर
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात ‘या’ बड्या शिवसेना नेत्याचा हात? दरेकरांच्या आरोपांनी खळबळ
अनिल देशमुखांची जप्त केलेली संपत्ती परत करा; कोर्टाने आदेश देत ईडीलाच फटकारले
‘या’ भारतीय क्रिकेटरवर कोसळला दुख:चा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने अर्ध्यावर सोडली IPL