नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीत शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता सर्वांचे लक्ष विधान परीषदेवर आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे, जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.(uddhav thackeray shocking statemnent on shisena leaders)
शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहीला नाही. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच एकदा मागे फाटाफूट झाली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधाम मला नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नकोय, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आहे. यावेळीच त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.
आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणूकीत आणखी वाढतील. सगळं आता काही बोलणार नाही. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजा. मला निवडणूकीची चिंता नाही. हारजीत तर होतच राहते. मी ठामपणे सांगतो आम्ही जिंकणारच आहोत. राज्यसभेच्या निवडणुकीत कोणाचं मत फुटलंय, ते सगळं समोर आलंय, हळुहळू कळेलच, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच विधान परिषदेच्या फाटाफुटीची शक्यता मला बिल्कूल वाटत नाही. शिवसेनेत आता गद्दार कुणीही राहिला नाही. अशीच एकदा मागे फाटाफूट झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधाम शिवसेनेत नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी विधान परीषदे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन सुनावलं आहे. अनेकांनी शिवसेना मोठी केली, पण त्यांना हे बघायला मिळाले नाही. त्यांनी भोगले नाही, आपल्याला मिळतंय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराजांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीये; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
VIDEO: उद्घाटनानंतर बोगद्यामध्ये पंतप्रधान मोदींना दिसला कचरा, त्यानंतर त्यांनी जे केलं ते पाहून सगळेच झाले शॉक
मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे