Share

शिवसेनेत भूकंप! आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं व्यक्तव्य; वाचा काय काय म्हणाले?

udhav thackeray

अजूनही शिवसेनेला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं नाहीये. विधान परिषदेच्या निकालानंतर शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे नेमके कोठे आहेत? याबाबत काल दिवसभर चर्चा सुरू होती.

मात्र अखेर आता शिंदे हे गुजरातमध्येच होते, हे काल रात्री उशिरा स्पष्ट झाले. याचबरोबर शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांचा आकडादेखील समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तसेच अपक्ष सात आमदारांना सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत.

यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे. ‘शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु’, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेचा जन्मच मुळात संघर्षातून झाला आहे. त्यामुळं अनेक संघर्ष शिवसेनेने पाहिले आहेत. आताही संघर्ष करू आणि पुन्हा संघर्षाने शिवसेना उभी करू. मी आतापर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, काल देखील मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं. ‘तुमचं काही नाही, माझं काही नाही तर जायचं कशाला? आता बोलत आहेत की, भाजपसोबत चला… जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना विचारला.

तर दुसरीकडे शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार पहाटे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार आज सोबत येणार आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार कोसळणार? ‘संपर्कात रहा! कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल,’ भाजपाचे आमदारांना तातडीचे आदेश
शिवसेनेला धक्का! उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचा आमदार शिंदेंच्या गोटात; रात्रीतून सुरतला पलायन
भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..
गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच साधला पत्रकारांशी संवाद, पहा नक्की काय म्हणाले?

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now