एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यत निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने जलील यांना थेट ऑफर दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, “सेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा”. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीने जलील यांना थेट ऑफर दिली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लासलगाव तालुक्यातील विंचूर येथे बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले.
‘खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले. जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. शरद पवार साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शाहरूख खानने जेव्हा होळीच्या दिवशी दिव्या भारतीला केलं होतं प्रपोज, असा चढला होता प्रेमाचा रंग
काश्मिर फाईल्स सुपरहिट झाल्यानंतर कंगना राणावतने विवेक अग्निहोत्रींसोबत केली हातमिळवणी
VIDEO: ८६ वर्षांच्या धर्मेंद्रने डोंगरावर चालवली ६२ वर्ष जुनी पहिली कार, कारची झलक पाहून मोहून जाल
काश्मिर फाईल्समुळे अक्षय कुमारच्या बच्चन पांडेची लागली वाट, कमावले फक्त ‘एवढे’ कोटी