बुधवारी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे. या सभेत मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधतील ते काय बोलतील याबाबत चर्चा होत होती. आता त्यांची सभा पार पडली आहे. या सभेत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. (uddhav thackeray on fadanvis babari incident)
या सभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी बाबरी मशिदीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बाबरी मशिदीवरुन वाद झाला होता. तेव्हा आपण बाबरीवर गेलो होतो, असे फडणवीस म्हणाले होते.
आता मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह देवेंद्र फडणवीसांचा हा दावा खोडून काढला आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात की, मी बाबरीला गेलो होतो. आपले मोरेश्वर सावे बाबरी पाडायला गेले होते की नाही? देवेंद्र फडणवीसांकडे आलेले सावे यांचे चिरंजीव जे आमदार झाले त्यांनी सांगावं की माझे बाबा गेले नाही. तुमच्याकडे हिंदुत्वाच्या मुद्यावर आमदार झालेत, खरं खोटं सांगून टाकावं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच देशात महागाई वाढत चालली आहे. रुपया घसरत चालला आहे. पण आपल्याला चिंता कशाची तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. ताजमहालच्या खाली काय आहे, ज्ञानवापी मशिदीच्या खाली काय आहे? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कोणी दिली? आम्ही असं नेमकं काय केलंय की आम्ही हिंदुत्व सोडलंय असं बोंबलत सुटलेत. चला होऊन जाऊ द्या. शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वासाठी काय केलंय हे खुल्या मंचावर बोलूया, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज दिले आहे.
तसेच तुम्ही कुणाला हिंदुत्व शिकवताय. बाबरी पाडल्यानंतर आडवाणी, अटलजी, सुंदरसिंह भंडारी यांची विधाने आहे. हे मी काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळाचं नाही सांगत आहे. हा गेल्या काही वर्षांपूर्वीचाच इतिहास आहे. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली नसती किंवा ते म्हणाले नसते की, बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा गर्व आहे, तर तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर दिल्ली काबीज करु शकला असता का? असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
१२ वी नापास झाले असाल तर टेन्शन घेऊ नका, ‘हे’ कोर्स करा अन् बक्कळ पैसे कमवा; जाणून घ्या सविस्तर…
ह्युंदाई, टाटाला मागे टाकत मारुती सुझुकीची ‘ही’ गाडी बनली नंबर वन, वाचा किंमत अन् फीचर्स
हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो