राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत ज्यामुळे अनेक लोकांचे लक्ष याकडे वेधले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. रवी दाम्पत्याच्या विरोधात मातोश्रीबाहेर अनेक शिवसैनिक पहारा देत होते. या सगळ्या शिवसैनिकांमध्ये एक आजीही होत्या ज्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
त्या आजींची स्वता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब जाऊन भेट घेतली आहे. त्या आजींचे नाव चंद्रभागा शिंदे आहे. ९२ वर्षीय या आजी शिवडी येथे राहतात. त्यांच्या घरी जाऊन उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना आंब्याची पेटी गिफ्ट केली आहे.
रश्मी ठाकरे यांनी आजींना भेटताच त्यांची गळाभेट घेतली. आजींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण त्यांना लहानपणापासून पाहत असून त्या आता आजी झाल्या आहेत, पण त्या अजूनही युवासेनेच्या सदस्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर यावेळी चंद्रभागा शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे एक मागणी केली.
त्यांनी आपल्या नातवासाठी एका नोकरीची आणि घराची मागणी केली आहे. येत्या रविवारी त्यांच्या नातवाचे लग्न आहे. यावेळी उद्धव ठाकरेंना त्यांनी लग्नाची पत्रिका देऊन लग्नात येण्याचे आमंत्रणही दिले. आजींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, जी व्यक्ती वयाने मोठी होत असते ती मनाने तरूण असली पाहिजे.
या आजी देखील वयाने ज्येष्ठ असल्या तरी मनाने त्या अजूनही युवा सैनिक हेत. हे असे शिवसैनिक मला मिळाले, हा बाळासाहेबांचा मला आशिर्वाद आहे. पुढे उद्धव ठाकरे त्यांचे कौतुक करताना म्हणाले की, काल कडाक्याच्या उन्हात या आजी बसल्या होत्या. आता त्यांनी करून दाखवलं, झुकेगा नहीं, हे बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केले आहेत, ते झुकणारे शिवसैनिक नाहीत.
दरम्यान, या आजी भाजीचा व्यवसाय करतात. तसेच त्या पोलीसदुत म्हणून काम करतात. पोलिसांना मदत करण्याचे मोलाचे काम त्या करतात. आजींना दोन मुलं आणि दोन नातवंड आहेत. त्यांचे पती आता या जगात नाहीत. ते बीपीटीमध्ये कामाला होते. आजींना त्यांची पेंशन मिळते. आजी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहेत. त्या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक होत्या.
महत्वाच्या बातम्या
मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ भूमिका अगम्य, हा १२ कोटी मराठी माणसांचा अपमान; आव्हाड भडकले
“मंगेशकर कुटुंबियांची ‘ही’ कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी”
नितेश राणेंनी सोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं; शिवसेनेने दिले आव्हान
“हनुमान चालीसा वाचून जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी”