राज्यात सत्तापालट होऊन अगदी काही आठवडे झाले आहेत. मात्र राजकीय घडामोडी काही केल्या शांत होण्याच नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यात शिवसेना विभागली. यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाल्याच पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पक्षबांधणीसाठी पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. मातोश्रीवर सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याचबरोबर थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून, पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.
चाळीस आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात जाण्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी देखील शिंदे गटाची वाट धरलेली पाहायला मिळत आहे. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंचा आपला पाठिंबा दर्शविला आहे.
काल मातोश्रीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. विशेष बाब म्हणजे, या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. ‘जे बंडखोर आहेत, ते लोकांना आकर्षित करण्यासाठी अफवा पसरवत आहेत, ३६५ दिवस काम करणारा शिवसेनिक आहे, सहा महिन्यानंतर पण निवडणूक लागल्या तरी चालेल,’ असं बैठकीत शिवसैनिकांनी म्हंटलं.
‘आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल,’ अशी देखील इच्छा बैठकीत शिवसैनिकांनी व्यक्त केली. ‘उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. बंडखोरांमुळे संघटनेला काही फरक पडणार नाही. त्यांच्यापेक्षा अधिक जोशाने काम करुन विधानसभेवर भगवा फडकवणार, असा विश्वास देखील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बैठकीनंतर रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी म्हंटलं आहे की, ‘कुठल्याही प्रकारची नाराजी पदाधिकाऱ्यांमध्ये नाही.’ आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असाही सूर बैठकीत निघाला असल्याच राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
”दोन आठवडे झाले राज्याला कृषीमंत्री नाही, पेट्रोलचे दर कमी करुन काही उपकार केले नाही”
सुशांत मृत्यू प्रकरण पुन्हा तापणार, आता बहिणीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली, मी त्याची रूम…
मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून आमदारांना पैशांचं आमिष, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप