महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरू आहे हे पुर्ण देशाला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. त्यातच उद्धव ठाकरे देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेली ही बंडखोरी तात्काळ कारणांनी झाली नसून, त्यामागे अनेक दिवसापासूंनची कारणं जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निकालानंतर बंडखोरी केली. आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले. मात्र एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या निर्णयापर्यंत का आले, याची पाळेमुळे अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्या वेळेपासूनची आहेत, असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुप प्रयत्न केले पण ते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. हे सगळं पाहून अखेर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा मातोश्रीला जाण्याचा निर्णय घेतला आणि वर्षा ते मातोश्रीचा ९ किलोमीटरचा पल्ला २ तासांत गाठला.
यावेळी हजारो शिवसैनिक जमले होते. शिवसैनिकांचे अफाट प्रेम पाहून प्रत्येकजण थक्क झाला. पण या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मात्र नाराज झालेले पाहायला मिळाले. रात्री ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी वर्षा बंगला सोडला म्हणून अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
वर्षा बंगला सोडताना बंगल्याबाहेर हजारो शिवसैनिक जमा झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या. जरी काही आमदार सोडून गेले असले तरी कट्टर शिवसैनिक तुमच्या पाठिशी आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. यावेळी काही कार्यकर्त्यांना रडू कोसळलं होतं. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. शिवसैनिकांचं हे प्रेम पाहून मुख्यमंत्र्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. शेवटी त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं अन् वाट काढत ते गाडीत बसले व मातोश्रीच्या दिशेने निघून गेले.
हे सगळं झाल्यानंतर साहजिकच एकनाथ शिंदे शिवसैनिकांच्या नजरेत खलनायक झाले आहेत. अनेक शिवसैनिक त्यांच्यावर संतापले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
https://twitter.com/ANI/status/1539657449530986496?s=20&t=wMPLOQIEbH914s5owyq_vg