Share

उद्धव ठाकरेंची बंडखोरांना शेवटची साद…; जाहीर पत्र लिहून केले ‘हे’ कळकळीचे आवाहन

जेव्हापासून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केेलेली आहे तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर अनेकदा शिवसेेनेच्या अनेक नेत्यांकडून त्यांना परत येण्याचेे आवाहन केले जात आहे. अनेकदा आवाहन करूनही ते परत येत नसल्याने शिवसेनेने त्यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.

राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात त्यांनी आंदोलने करायला सुरूवात केली आहे. अनेक आमदारांचे ऑफिस फोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांनी हे आवाहन जुमानलं नव्हतं.

त्यानंतर शिवसेना नेत्यांनी आणि खासकरून संजय राऊतांनी त्या बंडखोर आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यानंतर आज पुन्हा बंडखोर आमदारांनी शिवसेनेला डेडलाईन दिली होती. महाविकास आघाडी सोडून भाजपासोबत युती करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एक पाऊल मागे टाकत निवेदन जारी करून बंडखोरांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, समोर या, चर्चा करू, बसून मार्ग काढू. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहनही त्यांंनी यावेळी केलं आहे. आपण गेल्या अनेक दिवसांपासून गुवाहटीमध्ये अडकून पडलेला आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे.

आपल्यातील बरेच आमदार संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेना कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे.

आपण माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला आहे तो कोठेही मिळू शकणार नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, अशी भावनिक साद त्यांनी बंडखोरांना घातली आहे.

महत्वाच्या बातम्या
अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण
तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पडेल पाऊस
शिवसेना नेते संजय राऊतांनी दिले मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश
शिंदे गटातील ‘हा’ मंत्री म्हणतो मी शिवसेनेतच, उद्धव ठाकरेच माझे नेते; एकनाथ शिंदेना मोठा धक्का

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now