महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव सरकारमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदे यांच्या बंडाने खिंडार पडलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. गुरुवारी शिदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली. तर आता राजकीय नेत्यांकडून अनेक वेगवेगळी व्यक्तव्य समोर येत आहेत.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र शिंदेंनी तेव्हा नकार दिला, असा मोठा दावा केला होता. यावर आता शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी शिंदे यांना विचारलं की, ‘उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती का?’ पत्रकारांच्या या प्रश्नावर शिंदे यांनी मी काही बोलणार नाही, असे सांगितले. ‘ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली त्यांच्यासोबतच आम्ही सरकार स्थापन केलं आहे. कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही,’ असं शिंदे यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी स्वत:ला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो. मला पदाचा मोह नाही आणि स्वर्थासाठी मी निर्णय घेतलेला नाही. काही गोष्टी आवश्यकता भासल्यास स्पष्ट करण्यात येतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्हाला आनंद झालेला नाही, असे शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनल्यावर अभिनंदन केलं. त्याबद्दल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच आभार देखील मानलं. सध्या शिवसेनेत फुट पडली असून पक्षातच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.
चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 30 व्या वर्षी ‘या’ भयानक आजाराने मृत्यु
पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, अन् माझे आई वडील..; मुलीच्या गंभीर आरोपांनी खळबळ