Uddhav thackeray : आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता तो आता ५० खोक्यांचा बकासूर झाला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

uddhav thackeray | सध्या ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरू आहे. दोन्ही मेळाव्यांना लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांना धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. पण ज्या भाषणाची सगळे अतुरतेने वाट पाहत होते ते भाषण सुरू झाले. उद्धव ठाकरेंनी आपले भाषण सुरू करताच प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी गद्दारांवर प्रचंड टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेतून गद्दारी केली, मंत्रिपद काही काळासाठी आहे पण गद्दार हा शिक्का कायमस्वरूपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता तो आता ५० खोक्यांचा बकासूर झाला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला. मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक बघत होते. अमित शहा बोलले की, असं काही ठरलंच नव्हतं. पण मी शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचं असं ठरलं होतं. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही.

शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. याला आमदार केलं, मंत्री केलं, आताही मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा यांची गद्दारी सुरूच आहे. ही बाप चोरणारी औलाद आहे. पुढे फडणवीसांवर टोले लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत.

त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोण म्हणतोय चुन चुन के मारूंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे.

आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही कुत्री पाळायची का?  असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तकं टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला न बोलावता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदूत्व शिकवणार का? आम्ही भाजपची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदूत्व सोडलं नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

महत्वाच्या बातम्या
politics : ५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, मात्र विचारांचं खरं सोनं शिवाजी पार्कवरच मिळणार
Madhuri Dixit: भाड्याच्या घरातून आता स्वताच्या घरात शिफ्ट होणार माधुरी, तब्बल इतक्या कोटींना घेतला नवीन फ्लॅट
Border: बॉर्डर चित्रपट हिट होऊनही दुखी झाले होते दिग्दर्शक जेपी दत्ता, वाचा किस्सा
MNS : ‘टोमणे मेळाव्याची तयारी सुरू..मर्द छाताड, खंजीर, कोथळा, बॉम्ब, बाप पळवणारी टोळी’