Share

काल माईक खेचला पुढे काय खेचतील सांगता येत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

शिवसेना अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोले लगावले. ते म्हणाले की, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं की अपघात तर होणार नाही ना?

काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय खेचतील हे माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला. ते शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. शिवसेनेने महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती ज्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते.

या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोले लगावले. यावेळी ते असेही म्हणाले की, सर्व महिलांनी ताकदीने बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू आणि बंडखोरांना गाडू, असा प्रण केला आहे. काही काळ जावा लागतो.

त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाईल, असं बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, काल झाले असे होते की, अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले की, संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्याकडे आले?

त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणणारच होते की, कोणत्या म्हणजे शिवसेनेच्या. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला आणि म्हणाले की, ते त्या शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते. हे सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे जरा गोंधळलेले पाहायला मिळाले. पण याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळ्यांना कळालं की सरकारमध्ये कोणाचं वर्चस्व आहे.

सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आलं आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले की, महिलांना इथून पुढे राजकारणात 100 टक्के आरक्षण दिलं पाहिजे. पुरूषांनी गद्दारी केली पुरूष फुटले. महिला पाठिशी उभ्या राहिल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. महिला पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा पक्षाला ताकद मिळवून देणार.

महत्वाच्या बातम्या
‘या’ व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती गीता माँ, फोटो झाले होते व्हायरल, नाव वाचून अवाक व्हाल
महाराष्ट्रात झालेली ही राजकीय खेळी कोणी आणि कधी खेळली? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा
स्वातंत्र्यदिनी परेड पाहण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय मुलाने लोकांवर झाडल्या होत्या गोळ्या, वाचून हादराल
अजितदादा विरोधी पक्षनेते होताच फडणवीसांनी केले मोठे विधान, राष्ट्रवादीच्या पोटात आला गोळा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now