शिवसेना आणि ठाकरे नाव न लावता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान

राज्यात चाललेल्या घडामोडीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, माझ्या कुटुंबीयांवर आणि मातोश्रीवर ज्यांनी घाणेरडे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. मी शांत आहे पण षंढ नाही.

ज्यांची स्वप्न होती ती आजवर आपण पुर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मुळं आजही माझ्यासोबत आहेत. काही लोकं सांगत आहेत की माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबत घडणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वताचा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटलं मग मला वाटणार नाही का? या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीटच आता डोक्यात हाणणार.

मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मला सांगितलं की ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खुप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं की हिंमत माझ्या रक्तात आहे. पहिलं ऑपरेशन ठिक होतं पण ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी शरीराच्या काही हालचाली बंद झाल्या आहेत असं मला वाटलं. त्यामुळं मला दुसरं ऑपरेशन करावं लागलं.

याकाळातही विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला पण जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महत्वाकांशा असावी पण असी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे होते घेऊन जा.

आणखी कोणाला जायचं असेल तर त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढं त्यांनी बंडखोर आमदारांना आव्हान केलं की, शिवसेना आणि ठाकरे नाव न लावता जगून दाखवा. माझंही नाव लावायची गरज नाही पण बाळासाहेबांचं नावही लावायचं नाही, असं आव्हान त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
पाकिस्तान ते सौदी अरेबिया, जगभरात सर्च केलं जातंय एकनाथ शिंदेचं नाव, ‘या’ नेत्यांना टाकलं मागे
VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू
शिंदेंना मोठा झटका! चौधरींच्या गटनेतेपदाला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता; ‘त्या’ १२ जणांची आमदारकी रद्द होणार?
VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू