Share

ठाकरेंनी सुरुवात केली अन् अन्य राज्यांनीही मोदींवर सुरु केला टीकेचा भडीमार, पहा काय घडलं…

राज्यातच नाही, तर देशभऱात इंधनाचे दर वाढत चालले आहे. त्यामुळे विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहे. पण बुधवारी पंतप्रधान नरेंद्री मोदींनी या इंधन दरवाढीला राज्य सरकार कारण असल्याचे सांगितले आहे. राज्यांनीच पेट्रोवररील दरकपात करावी, असे मोदींनी म्हटले आहे. (uddhav thackeray criticize narendra modi)

मोदींच्या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरजार टीका केली आहे. त्यानंतर आता इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडूनही मोदींच्या आवाहनावर टीका केली जात आहे. बुधवारी मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.

मोदींनी वाढत्या पेट्रोलच्या दरांचा मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये मोदींनी काही राज्यातील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांची तुलना भाजपशासित राज्यातील दरांशी केली.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांनी काही कारणांमुळे व्हॅटमध्ये कपात केली नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळेच त्यांना इंधनासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

त्यानंतर यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तसेच महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे एकत्र केले तर महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. असे असतानाही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकी मिळणे बाकी आहे, असे उद्धव ठाकरेनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर इतर राज्यही केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसून आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींना धारेवर धरले. मोदींचा हा राजकीय अजेंडा असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाचे प्रवक्ते ए सरवनन यांनीही मोदींवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या-
हिंदीची तळी उचलणाऱ्या अजय देवगनची बोलती बंद; साऊथच्या अभिनेत्याने असे झापले की…
गरीब नवऱ्याकडून इच्छा पुर्ण होत नव्हत्या, मग बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा आणि…
‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रींनी खुलेआम दिले होते प्रचंड हाॅट न्युड सीन्स; पाहून प्रेक्षकांचा सुटला होता ताबा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now