Share

गाढवांनी आम्हाला लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना लाथ मारली; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुण राजकारण सुरु आहे. राज्यातील हिंदुत्वाच्या मुद्यानेही जोर धरला आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. (uddhav thackeray criticize devendra fadanvis)

राज्यातील हिंदुत्व, हनुमान चालिसा, नवनीत राणा, राज ठाकरे, भोंगे, भाजपकडून वारंवार होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. जमलेल्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली होती.

आमचं हिंदुत्व गदाधारी आहे बाकीच्यांचं घंटाधारी आहे बसा हलवत घंटा. त्यावर फडणवीस म्हणाले, यांचं हिंदुत्व गदाधारी नाही गधाधारी आहे. बरोबर आहे आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, अडीच वर्षांपूर्वीच आम्ही ते सोडलं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

तसेच आमचे काही जुने फोटो तुमच्याबरोबर येत आहेत, त्यामुळे गैरसमज झाला असेल की आमचं हिंदुत्व गधाधारी आहे. पण आम्ही आता ते सोडून दिलं आहे. शेवटी गाढव ते गाढवच. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, त्यांनी आम्हाला लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना लाथ मारली आणि बाहेर पडलो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, हिंदुत्व फक्त भाजपकडे आहे. मग इथे बसलेले कोण आहेत? हे हिंदु नाहीत का? हे जे हिंदु आहेत, यांच्या धमण्यांमध्ये भगवं रक्त शिवसेनाप्रमुखांनी रुजवलं आहे. हा हिंदु काय मेलेल्या आईचं दुध प्यायलेला नाही. कोणाची हिंमत आहे हिंदुवावर बोलण्याची, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

१ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर डोस सभा घेतली होती. या सभेत फडणवीसांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन जोरदार टीका केली होती. आता त्याच मुद्यांना हाताशी धरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावले आहे. उद्धव ठाकरेंची ही सभा बीकेसी येथे पार पडली आहे.

महत्वाच्या बातम्या-
नशेत गर्लफ्रेंडसोबत असा काही प्रकार घडला, ज्याचा त्याला थांगपत्ताच लागला नाही अन् जेव्हा कळलं तेव्हा..
‘मुंबई चा बाप राज साहेबच..!’ मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेनंतर मनसे आक्रमक
या मुन्नाभाईच्या डोक्यात केमीकल लोच्या झालाय, फिरू द्या त्याला; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now