Share

बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही, हिंमत असेल तर स्वता:च्या बापाच्या नावावर मत मागून दाखवा; उद्धव ठाकरेंचे आव्हान

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. (uddhav thackeray challenge to eknath shinde)

सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच त्यासाठी वेगवेगळ्या बैठकाही घेतल्या जात आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकारणीची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव त्यांच्या गटाला देण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. हिंमत असेल, तर स्वत:च्या बापाचे नाव वापरुन मत मागा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच पहिले नाथ होते, आता दास झाले आहे. बंडखोरांना त्यांचा निर्णय घेऊ द्या. पण त्यांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही. तसेच शिवसेनेचे नावही त्यांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी स्वत:च्या बापाचे नाव वापरुन मतं मागून दाखवावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेची मी गद्दारांना परत घेणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसैनिकांचा अजूनही मला पाठिंबा आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची होती आणि कायम त्यांचीच राहीन. तसेच शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहीन, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असे उपस्थित असलेल्या नेत्यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि बाळासाहेबांच्या नावाचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी शिवसेना राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा धक्का असणार आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
तोडफोडीनंतर तानाजी सावंतांची शिवसैनिकांना धमकी, औकातीत राहा, इथून आल्यानंतर जशास तसे
शिवसेना अडचणीत येताच मनसे धावली मदतीला; कोकणातील मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश
एकनाथ शिंदेंचे आमदारांबाबतचे ‘ते’ आरोप खोटे; गृहमंत्र्यांनी शिंदेंना तोंडावर आपटवले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now