याचेच एक उदाहरण आता समोर आलं आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला मोठे धक्के बसत आहेत. आमदार, खासदार, नगरसेवकांपासून आता कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. मात्र हेच चित्र नागपूरमध्ये थोडसं वेगळं पाहायला मिळालं आहे.
उद्धव ठाकरे गटाचे अमरावती जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. वानखेडे यांच्यासह अमरावती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि काही माजी नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
यामुळे नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. आगामी निवडणुकीत नागपूरमध्ये कोणाचं वर्चस्व असणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. वानखेडे यांच्या भाजप प्रवेशावर अद्याप शिवसेना यांनी शिंदे गटाची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप-शिंदे गटात खटके उडाले होते. अमरावतीचा पुढचा खासदार आणि आमदार भाजपचा असेल, असं बावनकुळे यांनी म्हंटलं होतं. बावनकुळे यांच्या व्यक्तव्याने शिंदे गटात नाराजी व्यक्त केली.
बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं असल्याच अडसूळ यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल